Prakash Ambedkar On Third Alliance In Maharashtra : वंचितचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी करुन महायुती आणि महाविकासआघाडी पर्याय देणार आहेत. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी थेट महायुतीचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना ऑफर दिली आहे. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य केले आहे. 


भुजबळ-मुंडेंनी ओबीसींचं संघटन करावं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे जर आमच्यासोबत आले तर महाराष्ट्रात आम्ही एकहाती सत्ता आणू असं मोठं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय.. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी हे विधान केलंय.. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंनी ओबीसींचं संघटन करावं अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवलीय. आता छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे प्रकाश आंबेडकरांची ही ऑफर स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..


विधानसभा निवडणुकीआधी मोठा राजकीय भूकंप होणार - प्रकाश आंबेडकर


राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.. मात्र त्याआधीच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलाय.. निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतरही राज्यात मोठी उलथापालथ होईल असा दावा आंबेडकरांनी केलाय.. 8 ते 12 ऑक्टोबरदरम्यान प्रचंड मोठी उलथापालथ होणार असून  महायुती आणि मविआच्या पक्षांमध्ये भूकंप होईल असा गौप्यस्फोट आंबेडकरांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात केलाय.. 
महायुतीत भूकंप होणार नाही. आमची विचारसरणी एक आहे. त्याच मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत, असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय भूकंपाबाबतच्या भाकितावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 


प्रकाश आंबेडकरांचं राजकारण  'सोशल इंजिनिअरींग'साठी ओळखलं जातं. राज्यातील तिसरी राजकीय शक्ती म्हणून उदयाला येण्याचं त्यांचं स्वप्नं 'भारिप'च्या नावानं पुर्ण होऊ शकलं नाही. म्हणूनच 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी 'वंचित बहुजन आघाडी' या नावानं स्वत:चं राजकारण व्यापक करण्याचा प्रयत्न केला. दलित, बहुजन समाजासह अठरापगड जातींना वंचितच्या छताखाली एकत्र आणण्याचं आंबेडकरांचं स्वप्नं होतं. मात्र, त्यांचं हे स्वप्न अद्याप पूर्ण झालेलं नाही..