Big Breaking! छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?
छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
chhagan bhujbal : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ यांचां मोठा निर्णय जाहीर केला आहे. नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते. मात्र, अद्याप उमेदवारीबाबात कोणताही निर्णय जाहीर झालेला नसल्याने छगन भुजबळ यांनी लोकसभ निवडणुक न लढवण्याची निर्णय जाहीर केला आहे.
अजून काही ठिकाणी उमेदवार ठरलेले नाहीत. नाशिकबाबत होळीच्या दिवशी अजितदादांचा निरोप आला म्हणून देवगिरीवर गेलो. दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठक झाल्याचे मला सांगितले. तेव्हा अजितदादांनी समीर भुजबळ यांचे नाव सांगितले. पण अमित शहा बोलले की तिथे छगन भुजबळ तिथे लढतील. मला उभे राहावं असं सांगितले गेले. यांनर मी नाशिकमध्ये आढावा घ्यायला सुरवात केली. लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला.
देवेंद्र फडणविस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलूनही मी माझ्या नावाची खातरजमा केली. पक्षाने जागा जाहीर करायला हवी होती. पण नंतर चर्चा सुरू झाल्या. नाशिकचा तिढा सुटलेला नाही. वेळ झाल्यास नुकसान होवू शकते. ताबोडतोब नाव जाहीर करायला हवे. समोरचा उमेदवार कामाला लागला आहे. मात्र, मी नाशिकच्या उमेदवारीवरून माघार घेतली आहे अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली.
नाशिकची जागा कुठल्याही पक्षाला सोडा, पण 20 मेपर्यंत निर्णय घ्या अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिलीय. नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे. हेमंत गोडसे हे नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत. तर, भुजबळांचं नावंही चर्चेत आहे. त्यामुळे काय तो निर्णय 20 मे पर्यंत घ्या अशी खोचक प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.
नाशिकच्या खासदारकीसाठी शेफाली भुजबळ यांच्या नावाची चर्चा
नाशिकच्या खासदारकीसाठी शेफाली भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचीही माहिती मिळत आहे. शेफाली भुजबळ समीर भुजबळ यांच्या पत्नी आहेत. त्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. नाशिकसह पाच लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कायम आहे. हेमंत गोडसेंच्या नावाची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठकही अजून झालेली नाही. दुसरीकडे छगन भुजबळांना मुंबईत थांबण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळतेय.. छगन भुजबळ रात्री उशिरा नाशिककडे निघाले होते मात्र त्यांना दौरा रद्द करावा लागला अशी माहिती सुत्रांनी दिलीय.