Sharad Pawar and Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा वाद कोर्टात पोहचला आहे. असं असताना शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील फूट ही एक मोठ रहस्य बनत चालली आहे.   शरद पवार गटानंतर आता अजित पवार गटानंही राष्ट्रवादीत फूट नसल्याचा दावा केला आहे. अजित पवार गटातील बड्या नेत्याचा खळबजनक गौप्यस्फोटमुळे संब्रम आणखी वाढला आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नसल्याचा छगन भुजबळ यांचा दावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नसल्याचा दावा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. केवळ अध्यक्ष, पदाधिकारी बदलले आहेत. तसं निवडणूक आयोगालाही कळवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या फुटीबाबतच्या संभ्रमात आणखीन भर पडलीय. 


प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांबरोबरचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला


राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नव्या संसदेतला एक फोटो ट्विट केला आहे. प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांबरोबरचा हा फोटो सोशल मिडियावर शेअर केल्याने चर्चेला उधाण आवे आहे. नव्या संसदेतलं राज्यसभेचं सभागृह सुंदर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबरचा हा क्षण स्पेशल आहे, असं पटेलांनी ट्विटमध्ये म्हटल आहे. 


नेत्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ


शरद पवारांचा आशीर्वाद आहे असं विधान अजित पवार गटाचे बडे नेते असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. तर, राष्ट्रवादीत फूट पडली नाही. सर्वजणं पवारांसाठीच काम करत असल्याच्या वक्तव्य शरद पवार गटासोबत असलेले राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केले होते. 


राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यासंदर्भात 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगासमोर सुनावणी


राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यासंदर्भात 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने सुनावणीसाठी बोलावलं आहे. चिन्हं आणि नावाबाबत ही सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो मान्य असेल असं अजित पवारांनी म्हटलंय. तर निवडणूक आयोगाची कार्यवाही पूर्वग्रह दूषित असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. 


राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी


अजित पवार यांच्या नेतृत्वाता राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला आहे.  2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.  यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे.