भुजबळांचे जोरदार शक्तीप्रदर्शन आणि मेळाव्यात गोंधळ
छगन भुजबळ यांनी आज बीडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्याचवेळी समता परिषदेच्या मेळाव्यात गोंधळ झाला.
बीड : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज बीडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ओबीसींच्या प्रश्नावर भुजबळ पुन्हा रस्त्यावर उतरलेत. बीडमध्ये येऊन हे शक्तीप्रदर्शन केल्याने धनंजय मुंडे यांनाही शह देण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या समता परिषदेच्या मेळाव्यात जोरदार गोंधळ झाला.
भुजबळ येताच जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. बीड का नेता जयदत्त क्षीरसागर जैसा होच्या घोषणा दिल्यात. प्रचंड घोषणाबाजी आणि स्टेजसमोर येऊन जयदत्त क्षिरसागर बसले. त्यामुळे भुजबळांच्या कार्यक्रमात जयदत्त क्षिरसागर यांचं वेगळंच शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांना हे शक्तीप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न क्षीरसागर यांच्याकडून झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भुजबळ यांच्या समता परिषदेच्या मेळाव्यात जोरदार गोंधळ पाहायला मिळा. बीडच्या स्थानिक राजकारणातील गटबाजी या परिषदेत दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच बीड का नेता कैसा हो...जयदत्त क्षीरसागर जैसा होच्या जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे या मेळाव्यात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. मात्र त्यानंतर भुजबळांसह सर्वच नेत्यांनी शांततेचं आवाहन केल्यामुळे अखेर मेळाव्याला शांततेत सुरूवात झाली.