Chhagan Bhujbal Hanuman Chalisa : हनुमान चालिसेवरून लोकसभेपूर्वी राजकीय वातावरण तापलेलं आपण बघितलं होतं.. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळांच्या भाषणादरम्यान हनुमान चालिसा वाजल्यानं हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. हनुमान चालिसावरून राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या विंचुर इथं एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे भाषण सुरु होते.. भाषणावेळी अचानक हनुमान चालिसेचा आवाज आला.. कार्यक्रमस्थळाच्या शेजारील एका मंदिरात ही हनुमान चालिसा लागल्यानं भुजबळांच्या भाषणात व्यत्यय आला..


दरम्यान भुजबळांनी आवाज कमी करण्याची पोलिसांकडे विनंती केली.. मी बजरंग बलीचा भक्त आहे.. पण आवाजामुळे भाषण कसं करणार, बजरंग बली तोड दुश्मन की नली,असं उद्गार त्यांनी काढलंय.. त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय..


भाषण संपल्यानंतर छगन भुजबळांनी आवाज कमी केल्यानं मंदिर प्रशासनाचे आभारही मानले.  भुजबळांच्या आवाज कमी करण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भुजबळांना चांगलंच सुनावलंय.. तर नवनीत राणांना नाव न घेता डिवचलंय
मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणणा-या नवनीत राणा आणि रवी राणा यांना भुजबळांनी तेव्हा फटकारलं होतं.. त्यामुळे आता राणा दाम्पत्य काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.. त्यामुळे हनुमान चालिसेच्या याच मुद्द्यावरून आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुन्हा राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही..