विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati sambhaji nagar) गुन्हेगारीच्या (Crime News) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्याचा आठवड्यात झालेल्या दंगलीमुळे संभाजीनगर हादरलं होतं. काही समाजकंटाकडून जाणीवपूर्वक हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अशातच आता पुन्हा एकदा एका 32 वर्षीय महिलेच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
 
छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा भागात हा सर्व प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. रविवारी रात्री चिखलठाणा विमानतळाच्या भिंतीजवळ अर्धनग्न आणि हात बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच एम.आय.डी. सी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटली असून सिडको पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे, रविवारी ही महिला चर्चमध्ये प्रार्थनेसाठी घरातून निघाली होती. मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. यानंतर कुटुंबियांनी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र महिलेचा शोध लागला नाही. रात्री अचानक विमानतळाच्या भिंतीजवळ या महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. महिलेचे हात बांधण्यात आले होते. तसेच महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा देखील होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थली धाव घेत एम.आय.डी. सी सिडको पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपासानंतर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.


टँकर खाली चिरडून डॉक्टर तरुणीचा मृत्यू


दरम्यान, आणखी एका दुर्दैवी घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये बाबा पेट्रोल पंपजवळ झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला. दिशा मधुकर काळे या 23 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सकाळी बाबा पेट्रोप पंप चौकात टँकरच्या मागच्या चाका खाली येऊन दिशाचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरसोबत असलेले दिशाचे वडील किरकोळ जखमी झाले आहेत.