Marathi News Today: आपल्या बाळाला वाचवण्यासाठी व बाळासाठी जीवाची धडपड एक आईच करु शकते. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये आईच्या नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार घडला आहे. एका आईनेच तिच्या आठ महिन्यांच्या बाळाला दुसऱ्या महिलेच्या हातात सोपवून पळ काढला आहे. या घटनेने एकच संताप व्यक्त केला जात आहे. चिमुकल्या बाळाला एकट सोडून जाणाऱ्या या महिलेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडली आहे. औषध आणण्याचा बहाणा करून ८ महिन्यांच्या बाळाला एका महिलेकडे देऊन आई पसार झाल्याची घटना घाटी रुग्णालयात सोमवारी रात्री घडली आहे.या बाळाला सध्या घाटीतील बालरोग विभागात दाखल करण्यात आले आहे. घाटी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 27 जवळ चेहऱ्याला स्कार्फ बांधलेल्या एका महिलेने स्वतःकडे असलेल्या 8 महिन्यांच्या बाळाला तिच्या जवळच्या बसलेल्या एका महिलेकडे सोपवले. तसंच, औषध घेऊन लगेच येते असा बहाणाही केला आणि तिथून पळ काढला, 


औषधी घेऊन लगेच येते असे सांगत ती महिला रुग्णालयातून पसार झाली. बराच वेळ होऊनही ती येत नसल्याने महिलेने शोधाशोध केली.पण ती कुठे आढळून आली नाही. अखेर या महिलेने आणि इतरांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालय गाठले आणि झालेला प्रकार निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितला. अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने झालेल्या प्रकाराची पडताळणी करण्यात आली. तेव्हा सदर महिला बाळाला सोडून पसार होत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी घाटी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर, महिलेने तिच्या बाळाला असे सोडून का दिले, याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाहीये. पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेचा शोध घेत आहेत. तर चिमुकल्या बाळाला पोटची आईच दुसऱ्या महिलेच्या हातात सोपवून गेल्याचे कळताच परिसरात संपात व्यक्त होत आहे. 


पालकांच्या डोळ्यांदेखत आत्महत्या 


सांगलीच्या कुपवाड येथील बामणोली मधील एका खाजगी  महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन विद्यार्थिनीने पालकांसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. एक नामांकित शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. शाळे सुटल्यानंतर नेहमीप्रणाणे ही अल्पवयीन तरुणी गेटबाहेर आली. त्यानंतर तिने तिची स्कूल बॅग स्कूल व्हॅनमध्ये ठेवली त्याचवेळी शाळेच्या आवारात तिचे पालकदेखील आले होते. पालकांना पाहताच विद्यार्थिनीने थेट शाळेत धाव घेतली. गेटमधून शाळेच्या आत शिरताच ती थेट दुसऱ्या मजल्यावर गेली. दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर तिने पालकांच्यादेखतच तिथून उडी घेतली.