बिलावरून टोळक्याचा वाद, हॉटेल मालक समजून जेवणाऱ्या इंजिनीअरच्या छातीत...` धक्कादायक प्रकार
Sambhajinagar Crime: झाल्टा परिसरातील हॉटेल यशवंतमध्ये बिलावरून एका टोळक्याचा वाद सुरू होता.
Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे हॉटेलमध्ये झालेल्या वादात इंजिनीअरचा नाहक बळी गेला आहे. झाल्टा परिसरात ही घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
झाल्टा परिसरातील हॉटेल यशवंतमध्ये बिलावरून एका टोळक्याचा वाद सुरू होता. यावेळी तेथे एक तरुण अभियंता तिथे जेवणासाठी गेला होता. हॉटेल मालकावर एका तरुण अभियंत्यावर हॉटेल मालक समजून टोळक्याने हल्ला करत छातीतच चाकू खुपसला. हा घाव छातीच्याजवळ हृदयात खोलवर लागल्याने अभियंताचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
संतोष राजू पेड्डी असे मयत अभियंत्याचे नाव आहे.
हत्या करणाऱ्या तीन आरोपींचा शोध चिकलठाणा पोलीस घेत आहेत. संतोष सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. पहाटे तीन वाजता त्याचं काम संपल्यावर त्याने ड्रायव्हरला बोलावलं आणि हॉटेलमध्ये जेवायला गेला. तिथे गेल्यावर हा सगळा राडा झाला.
संतोषवर हल्ला होताना पाहून ड्रायव्हर तात्काळ मदतीला धावला. मात्र हॉटेलमध्ये कुणीही मदतीला आलं नसल्याचे ड्रायव्हरचा म्हणणं आहे.त्याने संतोषला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला.अखेर ड्रायव्हरने त्याला रुग्णालयात नेलं मात्र तोपर्यंत संतोषचा मृत्यू झाला होता.
भर रस्त्यात भटक्या कुत्र्यांचा महिलेवर जीवघेणा हल्ला, चावा घेत फरफटत नेले आणि...
रिजेन्सी सर्वम येथील बिल्डिंग नंबर 8 व 9 च्या मागील बाजूस काल रात्री एका महिलेवर परिसरातील भटक्या कुत्र्यांनी जोरदार हल्ला केला. तिच्या शरिरावर चहुबाजून चावा घेत तिला फरफटत ओढत नेले. ती ओरडत राहिली पण कुत्रे तिला चावतच राहिले. कुत्र्यांच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होतंय. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. संबंधित अधिकारी घटनेची चौकशी करत आहेत. शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टिटवाळा येथील रिजन्सी कॉम्प्लेक्सच्या आवारात एका 68 वर्षीय महिलेवर कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला चढवला. एवढेच नव्हे तर कुत्र्यांनी महिलेला 50 मीटर अंतरापर्यंत ओढून नेले. त्यानंतर काही लोक धावत आले, त्यांना पाहताच कुत्रे महिलेला सोडून पळून गेले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे.जखमी महिलेला गोवेली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास जखमी महिलेला गोवेली रुग्णालयात आणण्यात आले. महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्यावर, पायावर आणि हातावर खोलवर जखमा झाल्यामुळे ती काही बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याची माहिती डॉ.दीपलक्ष्मी कांबळे यांनी दिली. महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर लगेचच या महिलेला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला कळवा रुग्णालयात पाठवले. तेथून आता तिला मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.