मुंबई / औरंगाबाद : Chhatrapati Shivaji Maharaj statue unveiled  : शिवजयंतीच्या आदल्या दिवशी संपूर्ण औरंगाबाद शहरात भगवे चैतन्य दिसून आले. निमित्त पण तसेच खास होते, औरंगाबादमधील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ 52 फूटी भव्य दिव्य उंचीच्या पुतळ्याचे अनावरण. देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प आहे. (Aurangabad: India's Largest Statue Of Chhatrapati Shivaji  Maharaj Statue)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ हा भव्य दिव्य पुतळा पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी बनविला आहे. महाराजांची मूर्ती इतकी सुबक की बघत राहावे. या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी केवळ औरंगाबादकरच नाही तर आसपासच्या भागातूनही अनेक जण गाडीघोडे घेऊन पोहोचले होते. पुतळा अनावणाच्यावेळी जय भवानी जय शिवाजी अशी गर्जना करत होते. 



औरंगाबादच्या क्रांती चौकमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे रात्री 11 च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उदघाटन झाले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई प्रत्यक्ष उ्घटनाला उपस्थित होते. शिवाजी महाराजांचा हा पुतळा सध्या देशातील सगळ्यात मोठा पुतळा असल्याचे सांगण्यात येत आहे.


महाराज्यांच्या पुतळ्याची उंची 21 फूट आहे तर वजन 7 टन आहे. पुतळ्याच्या चौथरा उंची 31फूट असल्याने एकूण पुतळा 52 फूट उंच आहे. पुतळ्याच्या भोवती 24 कमानीत 24 मावळ्यांच्या प्रतिकृती बसवण्यात आल्या आहेत.