छत्रपती शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर पदवी करता येणार!
Masters degree On Chhatrapati Shivaji Maharaj: ‘पीजी डिल्पोमा इन छत्रपती शिवाजी महाराज अॅज ए नेशन बिल्डर’असे या अभ्यासक्रमाचे नाव असणार आहे.
Masters degree On Chhatrapati Shivaji Maharaj: महाराष्ट्रासोबत देशातील नागरिकांसाठी अभिमानाची बातमी आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर पदवी घेता येणार आहे. यामुळे छत्रपती शिवरायांची युद्धनीती, धोरणे यांचा अभ्यास करता येणार आहे. आपण शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासला. शिवरायांनी विविध युद्धनितीचा अवलंब करुन स्वराज्याची निर्मिती केली. यासाठी त्यांना अनेक लढाया कराव्या लागल्या त्यांचे बालपण आणि जीवन चरित्र्य शालेय अभ्यासक्रमात अभ्यासले जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्कृष्ठ नेतृत्व, राष्ट्रनिर्माते म्हणून जगभरात अभ्यासले जातात. मात्र, संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांवर पूर्णवेळ अभ्यासक्राची अद्यापही निर्मिती झाली नव्हती. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज हा विषय घेऊन पदव्युत्त पदवी घेता येणार आहे.
शिवाजी महाराजांच्या राष्ट्र उभारणीची संकल्पना, राज्य म्हणून विचार, प्रशासन, युद्धनिती, जगभरातील योद्धांशी तुलनात्कम अभ्यास, गडकिल्ले क्षेत्रभेटी, नौदलाचे प्रणेते आदी विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक वर्षाच्या पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे
‘पीजी डिल्पोमा इन छत्रपती शिवाजी महाराज अॅज ए नेशन बिल्डर’असे या अभ्यासक्रमाचे नाव असणार आहे. यात वरिल सर्व विषय अभ्यासले जाणार असल्याची माहिती संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिली. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेता येणार आहे.
या वर्षीपासून या अभ्यासक्रमाला सुरूवात होणार आहे. कोणत्याही विद्याशाखेच्या पदवी धारकाला या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. पीजी डिल्पोमा इन छत्रपती शिवाजी महाराज अॅज ए नेशन बिल्डर या अभ्यासक्रमासाठी जवळपास 20 मुलांना पहिल्या वर्षी प्रवेश दिला जाणार आहे. यातील काही जागा बाहेरील देशातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील अशी माहिती देण्यात आली आहे.