चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ: शिवरायांच्या तोफांबद्दल आजही आपल्या सर्वांना अपार कौतुक आहे. त्या काळी बनवलेल्या या तोफा आजही तितक्या मजबूत आणि आकर्षक आहेत. आजही शिवरायांच्या काळात तोफ कुठेही पाहायला मिळाली की आपल्या अंगातही एक वेगळीच उर्जा आल्यासारखी जाणवते. सध्या असाच एक अभिमानास्पद घटना समोर आली आहे. ही घटना विसापूर येथील आहे. विसापूर गडाच्या पायथ्याशी ग्रामस्थांना शिवकालीन तोफ सापडली आहे. ही तोफ (cannon) सापडताच तिथल्या शिवभक्तांनी ही तोफ गडावर व्यवस्थित पोहचवण्याची व्यवस्था केली आणि गडावर नेली. ही यशस्वी मोहिम पाहून तुमच्याही डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत आणि छाती अभिनानानं भरल्याशिवाय राहणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विसापूर गडाच्या पायरी मार्गाजवळ (visarpur) आढळलेली शिवकालिन तोफ शिवप्रेमींकडून (Chhtrapati Shivaji Maharaj) गडावर स्थलांतरित करण्यात आली आहे.ही तोफ शासनाच्या अधिकारी यांचे तोंडी परवानगीने व गडपाल सतिश ढगे यांचे उपस्थितीमध्ये मावळ, कुलाबा, संभाजीनगर येथील शिवप्रेमी यांनी यशस्वीरित्या गडावर स्थलांतरित केली. 


हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद


तोफेची केली पूजा : 


त्यानुसार शिवप्रेमी व शिवभक्त एकत्र येत तोफेची पूजा करून ही तोफ गडावर नेण्याची मोहिम सुरू केली सुमारे चार तासांनंतर ही तोफ गडावर यशस्वीरित्या स्थलांतरित झाली. समोर आलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की शिवकालीन तोफ विसापूरच्या पायथ्याशी सापडल्यावर तिथल्या शिवप्रेमींनी तोफ साफ करून तिची पूजा केली. त्यानंतर हार चढवत तोफला आकर्षक असं रूप प्राप्त झालं. 


हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


गडावर सुखरूप नेली तोफ : 


वास्तविकच ही तोफ वजनानं खूप जास्त असल्यानं तिथल्या शिवप्रेमींनी एकत्र येत तोफला गडावर घेऊन जाण्याची मोहिम संपन्न केली. हा व्हिडीओ (Viral Video) पाहून तुम्हाला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओत शिवप्रेमी तोफेला व्यवस्थिता बांधून गडावर घेऊन जात आहेत. अपार कष्ट करत अखेर त्यांनी ही तोफ गडावर व्यवस्थित पोहचवली आहे.