मुंबई : छत्तीसगडच्या (Chhattisgarh) सुकमा जिल्ह्यात (Sukma district)  नक्षलवाद्यांनी केलेल्या एका IED स्फोटात (IED) एक जवान शहीद झाले आहेत. ठरवून केलेल्या या विस्फोटात सीआरपीएफ कोबरा २०६ बटालियनचे ७ जवान जखमी देखील झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रात्री IED स्फोटात एकूण ८ जवान जखमी झाले. या घटनेनंतर तात्काळ साऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी उपचारादरम्यान असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव (Assistant Commandant Nitin Bhalerao)  यांचे निधन झाले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्फोटात शहीद झालेले नितीन भालेराव हे नाशिकमधील इंदिरानगरमध्ये राहणारे होते. ही घटना समजताच परिसरात शोककळा पसरली आहे. असिस्टंट कमांडंट असलेले नितीन भालेराव या स्फोटात जबर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 


या घटनेबाबत जिल्ह्यातील पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी सांगितलं की, सुकमा जिल्ह्यातील ताडमेटला गावाजवळ विस्फोट ठेवण्यात आले होते. यामुळे केंद्रीय रिझर्व पोलीस दलातील सीआरपीएफचे कोबरा बटालियनची अनेक जवान जखी झाले आहे. सीआरपीएफच्या २०६ कोबरा बटालियनच्या जवानांना पेट्रोलिंग करता या क्षेत्रात रवाना करण्यात आलं होतं. या पेट्रोलिंग दरम्यान नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला.