Ghanshyam Darade On Gautami Patil: वेळेची मर्यादा न पाळल्याने बार्शी येथे पोलिसांनी गौतम पाटीलचा कार्यक्रम पोलिसांनी बंद पडला होता, त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. त्यावर आता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दराडे याने  भाष्य केलं आहे. त्यावेळी त्याने राज्याचं राजकारण, देशातील परिस्थिती यावर देखील बोट ठेवलं. काय म्हणतोय महाराष्ट्राचा छोटा पुढारी पाहूया...


काय म्हणाला छोटा पुढारी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सबसे कातिल गौतमी पाटील घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही. गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये. आपली लावणी ही लावणी ठेवा. त्याला अश्लीलतेचा रंग देवू नका. लावणी वगळता इतर अश्लीलतेचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत छोटा पुढारीने गौतमी पाटीलला सल्ला दिलाय. 


आपला आणि गौतमीचा कोणताही वाद नसला तरी लावणी बदनाम होऊ नये म्हणून आपण इशारा दिला, असंही छोटा पुढारी म्हणतो. तुम्हाला फेमस व्हायचं असेल तर तुमच्या कर्तुत्वावर जरूर व्हा. मात्र, चुकीच्या पद्धतीने अश्लीलता दाखवून फेमस होऊ नका, अशी विनंती देखील त्याने यावेळी केली आहे.


अजितदादांनी भाषणात सांगितलं की गौतमी पाटलांना बोलवा. अजितदादा कुठेही चुकीचं किंवा वाईट बोललेले नाहीत. त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नये, असं म्हणत छोट्या पुढारीने अजित पवारांना टोला लगावला आहे. वाकडेतिकडे चाळे करून तुम्ही जर डान्स केला तर येणाऱ्या पिढीवर काय संस्कार होतील? असा सवाल देखील छोटा पुढारी घनश्याम दराडे याने विचारला आहे. 


आणखी वाचा - तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडचा नियम अखेर मागे; झी २४ तासचा इम्पॅक्ट!


गौतमी ताईंना महाराष्ट्रावर कायम क्रेज टिकून ठेवायचं असेल तर चांगला कार्यक्रम आणि चांगला डान्स करावा लागेल, असं म्हणत छोट्या पुढारीने गौतमी पाटीलला चिमटा देखील काढला आहे. कुणाच्या बुडाखाली किती आमदार आहे हे समद्यांना माहितीये, असं म्हणत घनश्याम दराडे याने राज्याच्या राजकारणावर भाष्य केलंय.