Devendra Fadnavis on Elephanta Boat Accident: एलिफंटा बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नौदलाच्या स्पीड बोटने दिलेल्या धडकेमुळे गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला निघालेली फेरी उलटली आणि ही दुर्घटना घडली. या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. दरम्यान ही दुर्घटना नेमकी कशी घडली हेदेखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"अरबी समुद्रात बुचर आयलँडजवळ निलकमल कंपनीच्या प्रवीस बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. 3 वाजून 55 मिनिटांनी ही घटना घडली आहे. निलकमल बोटीच्या 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. नौदलाचे व्हाईस अॅडमिरल संजय जगजीत सिंह यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार सायंकाळी 7.30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित करण्यात आलं आहे. यामध्ये 3 नौदलाचे आणि 10 नागरिक आहेत. 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे," अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 


एलिफंटामधील दुर्घटनेचा Live व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद; आधी स्पीड बोटने धडक दिली अन् नंतर...


पुढे ते म्हणाले, "या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्ट गार्ड, मुंबई पोलीस यांनी तातडीने बचावकार्य हातात घेतलं. 11 क्पाऱ्ट आणि 4 हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरु आहे. त्यामुळे अंतिम माहिती उद्यापर्यंत हाती येईल. शासनाच्या सर्व यंत्रणांना कामी लागल्या आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत दिली जाईल. तसंच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी शासनाच्या आणि नौदलाच्या वतीने केली जाईल". 



Elephanta Boat Accident: बोट नेमकी कशी उलटली? मालकाने सांगितला सगळा घटनाक्रम; 3.15 वाजता...


 


"जी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार निलकमल बोट नीट चालली होती. नौदलाच्या बोटीला नवीन इंजिन लावण्यात आल्याने त्याची चाचणी घेतली जात होती. व्हिडीओत ते उपलब्ध आहे. ते 8 नंबर काढत होते. चाचणीच्या वेळी इंजिनचा काहीतरी समस्या झाली आणि त्यांचा ताबा गेला आणि नेव्हीच्या बोटीने निलकलमवर जाऊन आदळली. त्यातून हा अपघात झाला आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.