मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना, म्हणाले `यापुढे...`
Devendra Fadnavis in Cabinet Meeting: देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, पहिली कॅबिनेट बैठकही पार पडली आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
Devendra Fadnavis in Cabinet Meeting: देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान सरकार स्थापन होताच राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावं लागेल असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
'निकषाच्या बाहेर जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असेल तर....', पहिल्याच PC मध्ये फडणवीसांचा इशारा
शपथविधी होताच राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आणि अधिक गतीने, जोमाने काम करण्यास सांगितलं. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावं लागेल असं ते अधिकाऱ्यांना म्हणाले. आता गती वाढवू आणि अधिक खोलवर जाऊन चांगले निर्णय घेऊन शाश्वत विकास कसा साध्य करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूयात असंही ते म्हणाले
'हा कसोटी सामना आहे'
"पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितलं की, मागच्या काळात 50 ओव्हरची मॅच होती. नंतर अजित पवार आले आणि 20 ओव्हरची मॅच झाली. आता कसोटी सामना आहे. त्यामुळे नीट धोऱणात्मक निर्णय घेत राज्याला पुढे न्यायचं आहे. ज्या योजना सुरु केल्या आहेत, पायाभूत सुविधा, नदीजोड प्रकल्प, वेगवेगळे निर्णय पुढे सुरु ठेवायचे आहेत. आमच्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण कऱण्यासाठी पावलं उचलायची आहेत. दिलेली सर्व आश्वासं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. एक लोकाभिमुख सरकार, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं सरकार पुढेही पाहायला मिळेल. योग्य मार्ग काढत मार्गक्रमण करु असा विश्वास आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
'काही गोष्टी डोक्यात आहेत. दोन्ही मित्रांशी चर्चा करणं बाकी आहे. सध्या माझं लक्ष नदीजोड प्रकल्प सुरु झाला यावर आहे. सौरऊर्जेचे प्रकल्प, ज्यामध्ये रोजची डिलिव्हरी सुरु आहे. 2026 पर्यंत 16 हजार मेगाव्हॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. ही शाश्वत विकासाची कामं आहेत. यातील प्रत्येकाचा नीट फॉलो अप करावा लागतो. प्रक्रिया अधिक चांगली करण्याचा प्रयत्न असेल," असंही ते म्हणाले आहेत.