मुंबई : आज राज्यभरात दिग्गज नेत्यांचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. सर्वच पक्षांचे महत्त्वाचे नेते आज आपआपल्या मतदार संघात अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, छगन भुजबळ, नितेश राणे, एकनाथ शिंदे आज अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे नागपुरात भाजपाचे, बारामती आणि येवल्यात राष्ट्रवादीचे, कणकवलीत राणेंचे तर ठाण्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले आहेत. शक्तिप्रदर्शनासह नागपूर दक्षिण पश्चिममधून मुख्यमंत्री उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री सपत्नीक केंद्रीय मंत्री नितिन गडकरींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. 


राज्यात बिग फाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकवली विधानसभा मतदार संघात आज भाजपातर्फे नितेश राणे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नितेश राणे यांच्या विरोधात राणेंचे एकेकाळचे कट्टर समर्थक सतीश सावंत रिंगणात उतरत आहेत. या मतदार संघातून यापूर्वी संदेश पारकर यांनी अर्ज दाखल केला आहे. 


कुडाळ मालवण मधूनही आज राणेंच्या स्वाभिमान पक्षाचे दत्ता सामंत आज अर्ज भरणार आहेत. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बारामती या परंपरागत मतदारसंघातून अजित पवार अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवारांविरोधात भाजपातर्फे गोपीचंद पडळकर मैदानात उतरणार आहेत. बालेकिल्ल्यात निवडणूक लढत असल्याने पवारांसाठी हा पेपर सोपा आहे. अजित पवार आज शक्तिप्रदर्शन करून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ येवला मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सेनेचे संभाजी पवार यांच्याविरोधात त्यांची लढत होईल.