मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक; मनसे लोकसभा निवडणुकीतून बॅकआऊट करणार?
मनसे लोकसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
BJP-MNS Alliance : मनसे भाजप युतीची चर्चा सुरु असतानाच यात मोठा ट्विस्ट आला आहे. मनसे लोकसभा निवडणुकीतून बॅकआऊट करणार आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी माहिती समोर आली आहे. लोकसभेच्या जागांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळेच मनेसे माघार घेणार असल्याचे समजते. राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व जागांसाठी काल आक्रमक भूमिका घेतल्यानं मनसे लोकसभेची बॅकआऊट करण्याच्या मानसिकतेत आहे असं समजतंय. मनसेच्या दोन जणांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे.
महायुतीची दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळली होती. मनसेला एक जागा मिळणार असल्याची शक्यता असून दक्षिण मुंबईची जागा देण्यात येणार असल्याचं समजतंय. यापूर्वी ही जागा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन वेळा लढवलेली आहे. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळणार की राज ठाकरे दुस-या कुणाला मैदानात उतरवणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
महायुतीचं जागावाटप मनसेमुळे रखडले
महायुतीचं जागावाटप मनसेमुळे रखडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. तीन जागांवरील गुंतागुत मनसेच्या एन्ट्रीमुळे आणखी वाढलीय. नाशिक, दक्षिण मुंबई आणि शिर्डी या जागांवर तिढा आहे. शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभेच्या 13 जागा हव्या आहेत. मात्र भाजप दहाच्या वर जागा देणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान कुणामुळेही उशीर होत नसून पाच मिनिटात जागावाटप होईल अशी परिस्थिती असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीय.
मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार
मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक अपक्ष लढण्याचं जवळपास निश्चित झालंय...त्यांनी निवडणूक आयोगाकडे 'हातोडा' चिन्हाची मागणी केलीये...महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे अपक्ष लढण्याची शक्यता आहे...कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणारच या निर्णयावर वसंत मोरे ठाम आहेत...त्यामुळे पुण्यातील लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे...