शिंदे सरकारमधील मारकुटे मंत्री, आमदार संतोष बांगर यांच्यानंतर दादाजी भुसे यांची दादागिरी
Maharashtra News : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री आणि आमदार हात उचलत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Maharashtra Political News) या मंत्र्यांना आणि आमदारांना नक्की झालंय काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Maharashtra News : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री (Chief Minister Eknath Shinde government Minister) आणि आमदार हात उचलत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Maharashtra Political News) या मंत्र्यांना आणि आमदारांना नक्की झालंय काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. (Maharashtra Marathi News)बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाच व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटवर पोस्ट केला आहे.
मंत्री दादा भुसे यांनी पोलिसांसमोर एका युवकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलाय. व्हायरल झालेला व्हिडिओ कधीचा आहे, कुठला आहे याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या व्हिडिओमध्ये दादाजी भुसे दोन व्यक्तींना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दादाजी भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल केला आहे. पोलिसांसमोर एखाद्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे, कायदा सुव्यवस्थेचं काय, असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना जेवणाचे डब्बे पुरवणाऱ्या गोडाऊनच्या व्यवस्थापकाला मारहाण केली होती. शुभम हरण असं मारहाण झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी संतोष बांगर यांच्या कृत्याचा निषेध केला होता.
दरम्यान, आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांकडून पंढरपूरमधील विश्राम गृहावरील सुरक्षा रक्षकाला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पंढरपूरमधील (Pandharpur) विश्रामगृहातील सुरक्षा रक्षकाला आमदार संतोष बांगर (Hingoli Mla Santosh Bangar) यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आलीय. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्यानंतर त्यांनी शिवीगाळ देखील केली होती.
शनिवारी रात्री हिंगोलीतील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचे काही कार्यकर्ते पंढरपुरातील विश्रामगृहावर आले होते. यावेळी त्यांनी रूमबाबत चौकीदार सौरभ कदम यांना विचारणा केली. यावेळी त्यांनी आधी बुकिंग करावे लागते,आता वरिष्ठांसोबत संपर्क साधा असे सांगितले. या कारणावरून आमदार बांगर यांच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षक सौरभ कदम या तरुणाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला मारहाण देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, शिंदे गटाला पाठिंबा देणारे आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मारहाण प्रकरणी बच्चू कडू यांना न्यायालयाने नोटीस पाठवली होती. बच्चू कडू यांनी मंत्रालयातही अधिकाऱ्यांना मारहाण केली होती.