Eknath Shinde and Sharad Pawar In Pune : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या उपस्थित जोरदार बॅटिंग केली. (Political News) कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल शरद पवार यांचे धन्यवाद मानले. शरद पवार यांच्या तोंडी साखर असते, तर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतरावांच्या तोंडीपण थोडी असते.अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माझी आवर्जुन आठवण झाली असे म्हणत त्यांनी जोरदार राजकीय कोपरखळी मारली. त्याचवेळी त्यांनी पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले, शरद पवार मला जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा तेव्हा फोन करुन मार्गदर्शन करतात. (Maharashtra Political News)


'मला जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात मांजरी इथे वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटची आज 46 वी सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी शिंदे बोलत होते. मी नुकताच दाओसला जाऊन आलो. कोणी काही म्हटलं तरी राज्यसाठी मोठी गुंतवणूक आली आहे. नुकतीच मकर संक्रांत झाली. त्यामुळे गोड गोड बोलूया. शरद पवार मला जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा तेव्हा फोन करुन मार्गदर्शन करतात.  सहकाराच्याबाबतीत शरद पवार यांचा शब्द अंतिम असतो. केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करुन या क्षेत्रातीक प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले आहे. साखर कारखान्यांना शासनाने नेहमीच साह्य केलं आहे, भविष्यात देखील करत राहणार. साखर उत्पादनात महराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे, ही अभिमानास्पद बाब आहे, असे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 


राज्यातील जमीन सिंचनाखाली आणणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनांच्या इंधनात 10 टक्के इथेनॉल वापरण्याची परवानगी दिली. हे प्रमाण भविष्यात वाढणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न आहे. 18 सिंचन प्रकलप मार्गी लावले आहे. 2.5 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु केलीय. राज्य प्रगतीकडे वाटचाल करत आहे. शरद पवार यांनी केलेल्या कामाचा फायदा कृषी क्षेत्राला झालेला आहे.  त्यांचे ज्ञान मार्गदर्शक ठरले आहे. पवारसाहेबांनी असेच मार्गदर्शन करत राहावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.