Rajan Salvi : ठाकरे गटाचे राजन साळवी यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे का झाले मेहरबान?
MLA Rajan Salvi Security : कोकणतील राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्याबाबत महत्वाची बातमी. त्यांच्या सुरक्षेत अचनाक वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साळवी यांची सुरक्षा वाढवली आहे.
मुंबई : Rajan Salvi Y Plus Security : कोकणतील राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्याबाबत महत्वाची बातमी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) उपनेते राजन साळवी (Rajan Salvi) यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यांना आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ही सुरक्षा वाढविल्या असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साळवींवर का मेहरबान झाले, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
आमदार राजन साळवी शिंदे गटाच्या मार्गावर?, पाहा काय म्हणाले ते...
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे नाराज असल्याचे बोलले जात होते. तसेच ते लवकरच शिंदे गटात (Rajan Salvi on Shinde group entry) दाखल होतील अशीही बातमी होती. मात्र, राजन साळवी यांनी आपण बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत आहोत. आम्हाला कोणीही निष्ठा शिकविण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी आपल्याबाबत भाजपकडून षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे.
राजन साळवी (Rajan Salvi) हे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी काँग्रेसचे अविनाश लाड यांची भेट घेतल्याने साळवी नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे ते ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याचे बातमी समोर आली. मात्र, राजन साळवी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी निष्ठावंत आहे, याचा पुरावा देण्याची गरज नाही. सध्याच्या साऱ्या घटनांमध्ये भाजपचा हात आहे, त्यांचं हे षडयंत्र आहे, असा आरोप साळवी यांनी केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी आहेत. त्यांच्या सुरक्षेत अचनाक वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साळवी यांची सुरक्षा वाढवली आहे. साळवी यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साळवींवर का मेहरबान झालेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. दरम्यान, त्यांच्या सुरक्षा वाढीचे कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.