Ajit Pawar Vs Vijay Shivtare : बारामती लोकसभेच्या निवडणुकीत आणखीन रंगत आलीय. माजी आमदार विजय शिवतारे यांनी अपक्ष म्हणून बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. सासवडमध्ये झालेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत एकमतानं याबाबत निर्णय घेण्यात आला. बारामती मतदारसंघ कुणाची जहागीर नाही असं सांगत त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केलीये. विजय शिवतारेंनी बारामतीत पवारांनाच ललकारलं आहे. यातच आता शिंदे गटाच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना भेटीसाठी बोलावले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना फोन करून त्यांना भेटण्यासाठी बोलावले आहे. विजय शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. वर्षा बंगल्यावर ही भेट होणार आहे. शिवतरे यांनी अजित पवार याना चॅलेंज करत बारामती मधून निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली आहे.  उद्या या विषयावर मुख्यमंत्री आणि शिवतरे यांच्यात चर्चा होणार आहे.


विजय शिवतारेंनी पवार कुटुंबियांविरोधात एल्गार पुकारलाय. अजित पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबियांविरोधातच शिवतारेंनी शड्डू ठोकलाय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे बारामतीमधून अपक्ष म्हणून लढणार आहेत.  शिवतारेंनी अजित पवारांविरोधात शड्डूच ठोकलेला नाही. तर विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधातली भडासही बाहेर काढली. अजित पवारांवर घणाघाती प्रहार करत विजय शिवतारेंनी बदला घेण्याची भाषा केलीय. बारामतीतली पवारांविरोधातली मतं घेण्याचा इरादा शिवतारेंचा आहे. बारामती मतदारसंघ कुणाची जहागीर नाही असं सांगत त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केलीये.. तर विजय शिवतारे यांनी आपली औकात ओळखून राहावं, असं अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटलंय. 


अजित पवारांची पत्नी म्हणून सुनेत्रा पवारांना आम्ही मतदान का करायचं. असा जाहीर सवाल शिवतारेंनी विचारलाय.. तसंच या लढाई रावण कोण असेल हे सर्वांना माहित असल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधलाय. विजय शिवतारेंना पवारांविरोधात बारामती लोकसभेत दंड थोपटले आहेत.. तेव्हा बारामतीमध्ये आता पवार कुटुंब विरुद्ध शिवतारे असाच सामना रंगणार आहे.