नवी मुंबई : राज्यस्तरीय वृक्ष लागवड मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभारंभ केला. राज्यात १  जुलै ते ७ जुलै या कालावधीत वनमहोत्सव सप्ताह पाळण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचनिमित्त नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ताम्हण या राज्यपुष्पाचे रोपटे लावलं. गडकरींनी पिंपळाचं तर मुनगंटीवार यांनी कडुनिंब लावून चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा संकल्प केला. 


२०१० पर्यंत ५० कोटी वृक्ष लावण्याचं टार्गेट पूर्ण करु असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. या कार्यक्रमाचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. मुनगंटीवार यांनी मातोश्रीवर जाऊन हे निमंत्रण दिलं होतं. मात्र ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.



 उद्धव ठाकरे यांनी परवा फोन करून कार्यक्रमाला येणार नसल्याचे सांगितल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिलीय. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते.