मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. असे असताना आजच्या दोन नेत्यांच्या अचानक भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा बंद दाराआड असल्याने याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या चर्चेत नक्की काय घडले असेल याचीच जास्त उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यामध्ये अर्धा तास बैठक झाली. बंद दाराआड सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये ही बैठक झाली. आजच्या अचानक भेटीनं राजकीय चर्चा सुरु झाली आहे. पण जिल्ह्यातील विकास कामांसाठी भेटल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 



बैठकीत फक्त माझ्या मतदार संघतील विकास कामांसंदर्भात चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळासह इतर विषयांसंदर्भात देखील चर्चा झाल्याची मुनगंटीवार यांनी माहीती दिली आहे. मात्र, या भेटीबाबत अनेक जण तर्क लढवित आहेत.