रत्नागिरी : शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या रत्नागिरीतील व्यासपीठावरील नाराजी नाट्यानंतर बरीच चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. या कार्यक्रमात आपल्याला डावलल्याची खंत जाधव यांनी होती. मुख्यमंत्र्यांनी याचबाबत जाधव यांच्याशी संवाद साधल्याचे सांगितले जात आहे. भास्कर जाधव यांनी तीन जिल्ह्याच्या विकास आढावा बैठकीलाही दांडी मारली होती. त्यामुळे आधीपासूनच जाधव नाराज होते. मंत्रिमंडळात स्थान न मिळाले नाही. तेव्हापासून जाधव हे काहीसे नाराज होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात त्यांची नाराजी लपली नाही, उलट ती कॅमेऱ्यात चित्रितही झाली.


उद्धव ठाकरेंसमोर  जाधवांची जाहीर नाराजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली. व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आल्यानंतर आमदार भास्कर जाधव व्यासपीठावर आले आणि मागील रांगेत बसले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  उदय सामंत यांनी विनंती केल्यावर त्यांनी पहिल्या रांगेतील शेवटच्या खुर्चीत बसणे पसंत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्काराच्या वेळी खासदार विनायक राऊत यांनी लांब असलेल्या भास्कर जाधव यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला. मात्र भास्कर जाधव यांनी खासदार विनायक राऊत यांचा हात झटकला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्याच चित्रित झाला.


भास्कर जाधव यांची नाराजी कायम राहिली तर ते शिवसेनेला जड जाण्याची शक्यता होती. मंत्रिमंडळा विस्तारानंतर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मला मंत्रीपद मिळाले नाही तरी चालेल. पण मी कामात कुठे कमी पडलो, असा थेट सवाल उपस्थित करीत आपली नाराजी व्यक्त केली. पक्षाने मला जे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता केली नाही. माझ्यापेक्षा कनिष्ठ असल्यांना संधी दिली. मग आपण लायक नव्हतो का, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला होता. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला नाही. पुन्हा एकदा पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याच कार्यक्रमात ही नाराजी उफाळून आली. ही नाराजी पक्षासाठी चांगली नाही. याचा पक्षात वाईट संदेश जाईल, अशी भीती वर्तविण्यात आली होती. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट फोनवरुन जाधवांशी संवाद साधला. त्यामुळे त्यांची नारीज दूर झाल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे त्यांच्यातील चर्चेचा तपशील पुढे आलेला नाही.