चिपळूण : राज्यात गेल्या काही दिवस पावसाच्या हाहा:कार पाहायला मिळाला. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र (Westran Maharashtra) आणि कोकणातील (Konkan)  विशेष करुन महाड (Mahad) आणि चिपळूण (Chiplun) भागाला मोठा फटका बसला. यामध्ये चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाचा मोठा फटका बसला. शहरात पाणी भरल्याने ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. दरम्यान आज मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील (cm uddhav tahckeray) नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच त्यांनी पूरग्रस्तांसोबत संवादही साधला. यावेळस त्यांच्यासोबत आमदार भास्करराव जाधव, मंत्री अनिल परब आणि अन्य नेते उपस्थित होते. दरम्यान यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत चिपूळण पूरग्रस्तांना मदत देण्याबाबतच आश्वासन दिलं. (chief minister uddhav thackeray press confrence over to chiplun flood 2021)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री काय म्हणाले?


"पुरामुळे शेती, घरदाराचं तसेच दुकानाचं  मोठया प्रमाणात नुकसान झालंय. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत दिली जाईल. माझ्याकडे येत्या 2 दिवसात अहवाल येईल. अहवाल आल्यानंतर सर्वंकष मदत करेन", असं  आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना दिलं. तसेच "या आश्वासनासह  मी लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. तसेच कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही", असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.