मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला करणार संबोधित
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी 8 वाजता राज्यातील जनतेला सोशलमीडियाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी 8 वाजता राज्यातील जनतेला सोशलमीडियाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. राज्यातील सध्याची कोरोना स्थिती तसेच येणाऱ्या सण उत्सवांबाबत मुख्यमंत्री बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती, 25 राज्यांमध्ये लॉकडाऊनची शिथिलता, राज्यातील लसीकरण, लोकलमध्ये दोन दिलेल्यांना प्रवास करू देण्याची मागणी, हॉटेल आणि रेस्टॉरंटची वेळ वाढवून देण्याची मागणी इत्यादी विषयांवर मुख्यमंत्री राज्यातील जनतेला संबोधित करू शकतात.
तसेच पुणे सारख्या शहरामध्ये लॉकडाऊनमध्ये न मिळालेली शिथिलता, व्यापाऱ्यांचे प्रश्न याबाबतही मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे.
येत्या दिवसांमध्ये सण उत्सव आहेत. गणेशोत्सवासह इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी राज्य सरकारची भूमिका काय असणार आहे. याविषयी मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संबोधन लाईव्ह पहा Zee 24 Taas LIVE TV: