मुंबई : Shiv Sena Crisis : शिवसेनेत बंडाचे निषाण फडकविणारे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत जायचे आहे. बंडाआधी झालेल्या चर्चेचा उद्धव ठाकरे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. आमदारांच्या बंडामागे आपण नाही, असा थेट खुलासा नगरसेवकांच्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसैनिकांना भावनिक साद घालताना मुख्यमंत्री भावूक झाले होते. शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या भल्यासाठी झाली होती. ती चालवायला मी नालायक असेन तर मला सांगा, असे म्हणत उद्धव ठाकरे भावूक झाले. काही जण म्हणत होते, मेलो तरी शिवसेना सोडणार नाही. आज तेच पळून गेले. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, असे थेट आव्हान  उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी आपल्या सगळ्यांना पुन्हा जिद्दीने पक्ष उभा करण्याचे आवाहन केले. (Maharashtra Political Crisis) ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा, जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं, झाडीची फुलं न्या, फाद्या न्या, मुळ नेऊ शकत नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यानी बंडखोरांवर घणाघाती हल्ला चढवला.


एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निषाण फडकविल्यानंतर त्यांना शिवसेनेने तात्काळ मोठा दणका दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थक आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरुन हकालपट्टी केली. आता ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं?  नगरविकास खातं दिलं, माझ्याकडील दोन खाती शिंदेंना दिली, असे सांगत मला सत्तेचा लोभ नाही, वर्षा सोडून मातोश्रीवर आलो, कोण कसं वागलं यात जायचं नाही, बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं पाप, माझे मुख्यमंत्रीपद मान्य नसणं राक्षसी महत्त्वकांक्षा, असा घणाघात केला.


तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचवेळी त्यांनी बंडखोरी मागे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे.