सिडको जमीन व्यवहारांना मुख्यमंत्र्यांची स्थगिती
मुख्यमंत्र्यांची अखेर स्थगिती
नागपूर : न्यायालयीन चौकशी होईपर्यंत सिडको संबंधित भूखंड व्यवहारांना स्थगिती देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदमध्ये घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषनेनंतर कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. विरोधक गेल्या 2 दिवसांपासून या मुद्द्यावर आक्रमक होते. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत होती. या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्य़ाचा आरोप देखील काँग्रेसने केला होता.
नागपूर पावसाळी विधीमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात भरगच्च कामकाज होतं पण तिसऱ्या दिवशी देखील सिडको जमीन व्यवहारावरुन विरोधक आक्रमक होतील अशी शक्यता होती. पण नागपुरात मुसळधार पावसामुळे पाणी विधानभवनात शिरलं. ज्यामुळे कामकाजावर परिणाम झाला. विधान भवनातील वीजपुरवठा खंडित झाला होता. काही काळानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत जमीन भूखंडाच्या खरेदी विक्री प्रकरणावर बोलतांना या व्यवहारांनी स्थगिती देत असल्याचं म्हटलं आहे.