ठाणे : वसई येथे मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडून संतप्त नागरिकांनी बेदम चोप देऊन रक्तबंबाळ केले आहे. वसईच्या गिरीज नाक्यावर ही घटना घडली आहे. नावराबायकोच्या घटस्फोटित प्रकरणांतून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती वसई पोलिसणाकडून मिळाली आहे. काल दुपारी आज साडेचार वाजता गिरीज नाक्यावर आपल्या मुलाला घेऊन महिला रिक्षात बसली होती. याचवेळी चार बाईक स्वारांनी रिक्षासमोर मोटारसायकल आडवी लावली.


महिलेकडून ओढून मुलाचे अपहरण केले. त्यानंतर ते पळून गेले होते. मात्र, यांच्यातील एका मोटारसायकलवरील दोघे नागरिकांच्या ताब्यात सापडले. या दोघांना जमावाने बेदम चोप देऊन रक्ताबंबाल केले. या दोघांनाही वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वसई पोलिसांच्या तपासानंतरच अपहरणचे खरे कारण काय? कशासाठी आणि कोणी केले, याचा तपास पोलीस करत आहेत.