औरंगाबाद : घराशेजारी असलेल्या दुकानातून पैसे चोरल्याच्या आरोपामुळे व्यथित झालेल्या एका मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. चोरीचा आरोप झाल्याने मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरज क्षीरसागरवर शेजारछ्या दुकानातल्या सरला धुमाळ या महिलेनं चोरीचा आरोप केला होता. त्यामुळं तो व्यथित झाला होता. व्यथित झालेल्या या मुलाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घराशेजारील दुकानातून ५० रुपये चोरल्याचा आरोप सरला धुमाळ यांनी केला होता. शुक्रवारी दिवसभर या मुलाचा शोध सुरु होता. रात्री रेल्वेरुळावर त्याने आत्महत्या केल्याचं उघड झालं. ओळखपत्रावरून अखेर या मुलाची ओळख पटली. मुलाच्या वडिलांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर सरला धुमाळविरोधात पुंडलिकनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 


सूरज हा सहावीमध्ये शिकत होता. सरला यांनी केलेला आरोप हा त्याच्या जिव्हारी लागला. या चिमुकल्याने अतिशय टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.