Pune News: पिंपरी चिंचवडमध्ये वाकड पोलिसांनी लहान मुलांना चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवल आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगताप डेरी परिसरात काही महिला मुलाला विक्री साठी आणणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी सहा महिलांना अटक केली. या टोळीने आतापर्यंत पाच बालकांची तस्करी केल्याचं समोर आलं आहे. मात्र, पोलिसांनी सापळा रचत या टोळीला जेरबंद केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार पुण्यातील एका हॉस्पिटलमधील नर्सच्या मदतीने या महिला नवजात बाळांची खरेदी विक्री व्यवहार करत असल्याचं समोर आलं आहे. या टोळीतील महिलांनी पुणे शहराबाहेर आणखी कुठे बाळांची खरेदी - विक्रीचे व्यवहार केले आहेत का? याचा शोध सध्या वाकड पोलीस घेत आहेत.


रुग्णालयातील नर्सच देत होती माहिती


समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या दाम्पत्याला वंध्यत्वाची समस्या आहे. अशा दाम्पत्याची माहिती हॉस्पिटलमध्ये काम करणारी नर्स या टोळीतील महिलांना देत होती. त्यानंतर टोळीतील महिला वंध्यत्वाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या जोडप्यांना मिळून त्यांना पाच ते सात लाखात नवजात बाळ विकत देण्याचे प्रलोभन देत असायच्या. त्यासाठी या टोळीतील महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले जोडपे शोधायचे. 


आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेल्या पालकांना हेरायचे


एखाद्या जोडप्याला दोन पेक्षा जास्त मुले आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. अशा जोडप्याला पैशाचं आमिष दाखवून या टोळीतील महिला गरजवंत जोडप्याला नवजात बाळ विकत होते. ज्या जोडप्यांनी या टोळीतील महिलांकडून नवजात बालकांची बेकायदेशीर खरेदी केली अशा दांपत्यावरही पोलीस कठोर कारवाई करणार आहेत.