अमर काणे, झी मीडिया, नागपूर :  नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मदन गोपाळ शाळेतील 17 मुलांना विषबाधा झाली आहे. या मुलांना लता मंगेशकरकर हॉस्पिटलध्ये दाखल करण्यात आले. धक्कादायक म्हणजे शाळेच्या(Nagpur school) परिसरात एका अज्ञात व्यक्तीनं चॉकलेट वाटल्यानंतर मुलांना विषबाधा(poisoned by eating chocolate) झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॉकलेट खाल्ल्यानंतर मुलांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला. या विद्यार्थ्यांना चॉकलेटस कुणी वाटली, याचा शोध सुरू आहे. दरम्यान सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.


यात शाळेसमोर मुलांना चॉकलेट वाटणारा अज्ञात व्यक्ती कोण याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. यात काही सीसीटीव्ही सुद्धा तपासले जात असल्याची माहिती आहे. पण या घटनेने शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. यात शिक्षणाधिकारी यांनीही शाळेला भेट दिली आहे.