मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा :  सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. मतदानाची तारीख देखील जवळ आली आहे. सर्वांनी मतदान करायला हवं. एक सक्षम लोकशाहीसाठी मतदान करणे किती आवश्यक आहे, याचं महत्व वेगवेगळ्या प्रकारे पटवून दिलं जात आहे. बुलढाण्यात हा संदेश मोठ्यांपर्यंत चिमुकल्यांनी पोहोचवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदान करावे, यासाठी प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. 


पण बुलढाणा जिल्ह्यातील चिंचखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी मे क्या है. या गाण्याची आठवण करून देत हातावर मेहंदीने गो व्होट लिहून वेगळा संदेश दिलाय.  


अर्थातच मुठ्ठी मे है तकदीर हमारी, असं हे चिमुकले मतदारांना सांगताय. या आगळ्यावेगळ्या क्लुप्तीमुळे हा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय झाला आहे.