पुणे : ऑनलाईन गेमचा (Online Game) नाद खूप वाईट. हेच बऱ्याचदा चिमुकल्यांना समजत नाही. लहान मुलं गेमच्यामोहात अडकतात आणि फसतात. त्यातून अनेक अडचणी आणि धोकेही निर्माण होतात. हेच बऱ्याचदा चिमुकल्यांना समजत नाही. त्यातून उद्भवणाऱ्या अडचणींना घरातल्या इतर सदस्यांना सामोरं जावं लागतं. अनेकदा तर आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्याचा फटका पालकांना सहन करावा लागतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन भावांचा गेम खेळण्याचा नाद लागला. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आई-वडिलांना भोगावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे 2 भाऊ आईच्या फोनवर गेम खेळायचे. असाच एक दिवशी अज्ञाताने सोशल मीडियावर रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर आरोपी मुलांसोबत बोलू लागला. मुलांना तो गेम खेळा, मी तुम्हाला डायमंड मेंबरशिप देतो, असं अमिष दिलं. मुलांनी अज्ञाताला 2-3 वेळा नकार दिला. मात्र त्यानंतर अज्ञाताने मुलांना फोन केला. त्या दोघांना विश्वासात घेतलं आणि बँकिंग डिटेल्स घेतले अन् इथेच घात गेम ओव्हर झाला.


बँकिंग डिटेल्स मिळाल्यानंतर अज्ञाताने मोबाईल हॅक केला. त्यानंतर त्याने अनेकवेळा पैसे ट्रान्सफर केले. त्यांच्या खात्यातून जवळपास 1.27 लाख रुपये काढण्यात आले. पैसे कमी होत असल्याचं मुलांच्या वडिलांच्या लक्षात आलं. नक्की काय होतंय, हे जाणून घेण्यासाठी पालकांनी बँक स्टेटमेंट तपासलं.  तेव्हा त्यांना  खात्यातून पैसे काढले जात असल्याचं लक्षात आलं. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. 


मुलांना मोबाईल देणं टाळा


दरम्यान, सध्या ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. ऑनलाईन व्यवहारांमुळे आपल्या बँक सर्व कनेक्ट असतात. त्यामुळे लहान मुलांच्या हातात आपला फोन देणं टाळा. नाहीतर तुम्हालाही मोठा आर्थिक फटका बसू शकतो.