सिंधुदुर्ग : Chipi Airport Inauguration :चिपी विमानतळाचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांनी विकासकामांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. सिंधुदुर्गात झालेल्या विकासासाठी राणे कारणीभूत आहोत. दुसऱ्याचे नाव येऊच शकत नाही, असा निशाणा त्यांनी यावेळी साधला. चिपी विमानतळ उद्घाटन निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यामुळे याबाबत बरीच राजकीय चर्चा सुरू झाली होती. चिपी विमानतळाचे लोकार्पण केले. कोकण वासियांसाठी ऐतिहासिक क्षण होता. (Chipi Airport Inauguration : Narayan rane targets shivsena and CM Uddhav Thackeray)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण राणे बोलायला उभे राहिले. त्यावेळी राणे समर्थकांची घोषणाबाजी केली. यावेळी राणे म्हणाले, राजकारण करू नये असं वाटत होते. मुख्यमंत्री साहेब भेटले आणि कानात बोलले माझ्या.  विमानतळाचे मालक कोण हे आज समजले. तुम्हाला मिळत असलेली माहिती चुकीची आहे. आदित्यवर बोलणार नाही, तो टॅक्स फ्री आहे. वाईट हेतूने येवू नका. चांगल्या मनाने या, असा टोला राणे यांनी यावेळी लगावला.


1990 साली बाळासाहेबांनी या जिल्ह्यात पाठवले. पिण्याचे पाणी नव्हते, रस्ते नव्हते, वीज नव्हती, शैक्षणिक दुरावस्था होती. मुंबईवर अवलंबून असलेल्या जिल्ह्याचा विकास करायचा ठरवला. कुणी विकास केला हे लोक ठरवतील. उद्धवजी, साहेबांच्या प्रेमातून हे सर्व केले, असे राणे म्हणाले.


टाटा इन्सिट्यूटने पर्यटन विकासाचा अहवाल मला दिला. त्यानंतर सेना भाजपची सत्ता आली आणि पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत केला. मग सर्व सोयी इथ आणल्या. साहेबांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. रस्त्यांसाठी 120  कोटी, पिण्याच्या पाण्यासाठी 118 कोटी मी दिले. हे बदलतंय ते फक्त नारायण राणेंमुळे. दुसरं कुणाचे नाव नाही येवू शकत
हे सर्व साहेबांचे श्रेय, असे राणे म्हणाले.


उद्धवजींना विनंती, मी व प्रभू इथं भूमीपूजनाला आलो होतो. तेव्हा विरोध झाला होता. नाव घेतलं तर राजकारण होईल. कामात कोण अडथळा आणतंय. कोण अडवत होते..विचार त्यांना. सी वर्ल्ड कुणी रद्द केले. भांडे किती फोडायचे,  परिस्थिती बदलतंय. तुम्ही आलात बरे वाटले. आदित्य ठाकरे पर्यटनंमत्री आहेत...त्यांनी अहवाल वाचावा. धरणांची कामे झाली नाहीत. कसला विकास, विमानतळ झाले, जाताना काय खडडे पाहावेत का, असे राणे म्हणाले.