अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास अमरावती : राज्यातील धक्कादायक बातमी आहे. मेळघाटातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात कॉलरा आजाराचा शिरकाव झालाय.  80 पेक्षा अधिक जणांना लागण झाली आहे. कॉलरामुळे तिघांचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावातील नागरिकांना 80 पेक्ष्या अधिक जणांना कॉलराची लागण व 3 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


गावातील नळाचे वीज बिल न भरल्याने या गावांत नळ येत नव्हते त्यामुळे गावातील नागरिकांनी गावाशेजारील उघड्या विहरितील अशुद्ध पाणी पिल्याने त्यांना कॉलरा सारख्या आजाराची लागण झाल्याचं डॉक्टरांनी मान्य केलं आहे. 


त्यामुळे रुग्णांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. तर गावाशेजारी असणाऱ्या कटकुंभ चुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 30 ते 35 रुग्णांवर उपचार सुरू आहे. 


तर रुग्णालयात जागा अपुरी पडत असल्याने पाचडोंगरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेलत 40 ते 45 रुग्णांवर उपचार सुरू आहे त्यामुळे जमिनीवर झोपून रुग्णांना उपचार घ्यावा लागत आहे