काँग्रेस नेत्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला, गंभीर जखमी
रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि महाड तालुक्यातील काँग्रेस नेते इब्राहीम झमाने यांच्यावर पाच अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. चॉपर आणि लाकडी दांडक्याने अचानकपणे त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि महाड तालुक्यातील काँग्रेस नेते इब्राहीम झमाने यांच्यावर पाच अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. चॉपर आणि लाकडी दांडक्याने अचानकपणे त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.
जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल
या हल्ल्यात झमाने हे गंभीररित्या जखमी झालेत. महाड तालुक्यातील अप्पर तुडील गावात पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी झमाने यांना तातडीने महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हल्ला करुन हल्लेखोराचे पलायन
हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झालेत. याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करताहेत. या प्रकारामुळे महाड परिसरात संतापाचं वातावरण पसरलंय.