ठाणे : खंडणीच्या आरोपावरुन तुरुंगात असलेल्या इकबाल कासकर प्रकरणात, आता छोटा शकीलही पोलिसांच्या रडारवर आला आहे. छोटा शकीलनं एका अवैध कामासाठी आर्थिक रसद पुरवल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इकबाल कासकरची गँग छोटा शकील चालवायचा. हत्यारांसाठी फंडिंग करणं आणि बिल्डरांना फोन करण्याचं काम छोटा शकील करत होता. छोटा शकील वॉन्टेड आहे. त्यासाठीच इकबालची चौकशी केली जाणार आहे. शिवाय दाऊद गँगशी संबंधित चार पाच गँगस्टरचीही पोलिसांना माहिती हवी आहे. त्यासाठी इकबालच्या वाढीव कोठडीची मागणी ठाणे पोलिसांनी न्यायालयाकडे केली. त्याला न्यायालयानं मान्यता देत, इकबाल कासकरला चार दिवसांची वाढीव पोलीस कोठडी दिली आहे.