मुंबई : महाराष्ट्र सीआयडी शाखेकडून मंगळवारी पालघर हत्याकांड प्रकरणी आणखी २४ जणांना अटक केलं. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या हत्याकांडामध्ये सहभाग असल्याच्या आरोपातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मॉब लिंचिंगमध्ये तीन साधुंची अमानुष हत्या केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणाअंतर्गत जवळपास १३३ जणांना ताब्यात घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटक करण्यात आलेल्या १३३ जणांमध्ये ९ अल्पवयीनही समाविष्ट आहेत. पालघर प्रकरणाला चालना मिळताच तातडीने त्यावर कारवाई करण्यादे आदेश देण्यात आले. ज्यामध्ये पाच पोलीसांचं निलंबनही करण्यात आलं. तर, पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या ३५ कर्मचाऱ्यांची तातडीने बदलीही करण्यात आली. 


१ मे रोजी महाराष्ट्राच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजेच सीआयडी शाखेकडून पालघर हत्याकांड प्रकरणात पाच जणांना अटक केली होती. जेव्हापासून या घटनेच्या तपासानं आणखी वेग पकडला होता. 


 


पालघरमधील गडचिंचले गावात गावात मोठा जमाव जमला असून काही प्रवाशांना (साधूंना) मारहाण केली होती. लॉकडाऊनच्या काळात ही अतिशय धक्कादायक घटना घडली होती. जिथे जमावाकडून करण्यात आलेल्या मारहाणीत तीन साधूंना त्यांचा जीव गमावावा लागला होता. सर्वच स्तरांतून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी नाराजीचा सूर आळवत यातून दोषींची सुटका नाही हे ठामपणे सांगितलं होतं.