Cidco Lottery 2024: तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील 3,322 घरांसाठी सिडकोने लॉटरी काढली होती. 16 एप्रिल रोजी ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. त्यानंतर सिडको लॉटरीची सोडत कधी काढणार अशी प्रतिक्षा अर्जदारांना होती. मात्र आता सिडकोच्या घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सिडको भवनात 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोडत होणार आहे. सिडकोने याबाबत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच सिडकोने 3,322 घरांची योजना जाहीर केली होती. त्यासाठी 16 एप्रिलला अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर 19 एप्रिलला संगणकीय सोडत करण्यात येणार होती. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळं ही सोडत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 7 जूनचा मुहूर्त निश्चित केला होता. मात्र, नंतरही विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. 


आता विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर म्हणजेच 12 जुलैनंतर सोडतीचा मुहूर्त निश्चित केला जाणार आहे. 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सिडकोची सोडत काढली जाणार आहे. सोडतीनंतर त्याचदिवशी संध्याकाळी 6 वाजता विजयी अर्जदाराच्या नावांची यादी जारी केली जाणार आहे. तसंच, न जिंकलेल्या अर्जदारांना 29 जुलैला अनामत रकमेचा परतावा मिळणार आहे, अशी माहिती सिडकोने दिली आहे. सिडकोने सोडतीची माहिती दिल्यानंतर अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


सिडकोकडून नवी मुंबईसह जवळच्या परिसरात परवडणारी घरे उपलब्ध करुन दिले जातात. मुंबईलगतच्या परिसरात घरांच्या किंमती गगनाला पोहोचल्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांना घर घेणे मुश्कील होते. अशावेळी सिडकोकडून परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करुन देण्यात येतात. सिडकोने तळोजा आणि द्रोणागिरी येथे 3322 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्यापैकी 61 घरे द्रोणागिरी नोड आणि 251 घरे तळोजा येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. तर द्रोणागिरीतील 374 आणि तळोजातील 2636 घरं सर्वसाधारण घटकांसाठी आहेत.