Cidco Lottery : नवी मुंबईत (Navi Mumbai) घरांचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सिडकोनं परवडणाऱ्या दारत घरं उपलब्ध करुन देतात. सिडकोच्या लॉटरीला लोकांचा उंदड प्रतिसाद मिळतो. सिडकोने आता भन्नाट ऑफर आणली आहे. सिलेक्ट माय सिडको होम (Select My CIDCO Home) अशी ही योजना आहे. या योजने अंतर्गत  लोकेशन सिलेक्ट करून घर खरेदी करता येणार आहे (Cidco Lottery ). 


नेमकी काय आहे सिलेक्ट माय सिडको होम योजना? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महामुंबई क्षेत्रात घराच्या शोधात असणा-यांसाठी या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सिलेक्ट माय सिडको होम अशी अशी सिडकोची योजना असणार आहे. सिडकोचे नवीन  धोरण लवकरच जाहीर होणार आहे. सिलेक्ट माय सिडको होम  
ही योजना म्हणजे स्वतःचं स्वतः घर निवडणे अशी ही योजना आहे. सिडकोची नवीन घर रेल्वे स्टेशन लागून असणार आहेत. सिडकोच्या या  नवीन योजनेत ऑनलाईन लिंक वर जाऊन लोकशेन ठिकाण सिलेक्ट करून घर खरेदी करता येवू शकते. नवी मुंबईत आपल्या आवडत्या ठिकाणी घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी सिडकोकडून मिळणार आहे.  फक्त लोकेशनच नाही तर आपल्या पसंतीच्या मजल्यावर देखील घर निवडण्याचा पर्याय असणार आहे. 


सिडकोची 5000 घरांसाठी लॉटरी


सिडको लवकरच 5000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. तळोजा नोडमधील घरं सोडतीसाठी तयार आहेत. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर म्हाडातून अनिल डिग्गीकर आले आहेत. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यावर ही लॉटरी निघेल. सिडको सध्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, उलवे, कळंबोली या भागात मोठ्या प्रमाणात घरं बांधत आहे. 31 मे या दिवशीच ही लॉटरी निघणार होती, मात्र त्याचवेळी सिडकोचे एमडी डॉ. मुखर्जींची बदली झाले. त्यानंतर डिग्गीकर एमडी झालेत. आता त्यांचा ग्रीन सिग्नल मिळाला की लगेच लॉटरी निघेल. प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्वाने ही लॉटरी निघेल. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य योजनेनुसार ही लॉटरी काढण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली तयार करण्यात आलीय. ही घरं वाशी, जुईनगर, खारघर, मानसरोवर, उलवे आणि कळंबोली या ठिकाणी ही घरं आहेत.


सिडकोच्या अत्यल्प उत्पन्न  गटातील  घराच्या किंमती कमी करण्याची मागणी


सिडकोच्या अत्यल्प उत्पन्न  गटातील  घराच्या किंमती कमी करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. सिडकोच्या 2022मधील खरकोपर बामन डोंगरीच्या घराची लॉटरी निघाली.यात EWS साठी असलेल्या घरांच्या किंमती अचानक 35 लाख करण्यात आल्यात त्यामुळे वार्षिक उत्पन्न 3 लाखांचं असणाऱ्या या वर्गानं किंमती कमी करण्याची मागणी केली आहे.