नवी मुंबई : CIDCO 5000 Homes : सिडकोच्या 5000 घरांची सोडत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कोरोना रूग्णवाढीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच काही अधिकारीही बाधीत झाले आहेत. (CIDCO's 5,000 homes delayed due to coronavirus?)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना रूग्णवाढीमुळे पाच हजार घरांची सोडत काढण्यात येणार होती. ही सोडत 26 जानेवारीला होणार होती. मात्र, राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे एमडी डॉ. संजय मुखर्जी हे दोघेही कोरोनाबाधीत आढळले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. यातले काही अधिकारी कर्मचारीही बाधीत आढळण्याची भीती आहे. 


दोनच दिवसांपूर्वी शिंदे यांनी सिडको अधिकाऱ्यांसोबत नवी मुंबई मेट्रोच्या खारघर ते पेंधर या पाच किलोमीटर लांबीच्या मार्गाची पाहणी केली होती. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.