कोकणात ढगफुटी! चिपळुणच्या अनारी गावात पडला धडकी भरवणारा पाऊस
कोकणात ढगफुटी सारखा पाऊस पडला आहे. पावसाचे रौद्ररुप पाहून ग्रामस्थ हैराण झाले.
maharashtra unseasonal rain : राज्यभरात अवकाळी पावसाने धुडगूस घातला आहे. अशातच कोकणात ढगफुटी सदृष्य पाऊस पडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यात येणाऱ्या अनारी गावात धडकी भरवणारा पाऊस पडला आहे. पावसाचै रौद्ररुप पाहून ग्रामस्थ भयभित झाले. या मुसळधार पावसामुळे अवघ्या तासाभरात येथील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले.
पावसाने चिपळूण तालुक्याला झोडपले असून अनारी ग्रामस्थांनी प्रथमच पावसाचे रौद्ररूप अनुभवले. अनारीच्या डोंगरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला त्यामुळे शेतकरी भयभीत झाले. या पावलामुळे नदी नाले यांना पूर आला. मे महिन्यातच आलेल्या या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. अनारी गावात पूल बांधकामाचे काम सुरू होते त्याचे साहित्य देखील या पावासमुळे वाहून गेले. तर या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली आले. यामुळे गावाचा संपर्क तुटला. येथील जनजीवन विस्कळीत झाले. एका तासात 110 मी मी पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे अनारी भागात ढगफुटी झालीय असं इथले ग्रामस्थ सांगत आहेत.
दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार वा-यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्याचबरोबर ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
मान्सूनचं अंदमानात आगमन
सर्वांनाच प्रतिक्षा असलेल्या मान्सूनचं आज अंदमानात आगमन झाल आहे. अंदमान-निकोबार, मालदीव आणि कोमोरीन भागात मान्सूनचं आगमन झालंय.. हवामान विभागानं याबात माहिती दिली. 31 मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीत दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 11 जूनला दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यावर्षी मान्सूनचा पाऊस जवळपास 106 टक्के होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलंय..
विदर्भात वादळी वा-यासह पावसाचा इशारा
विदर्भात पुढील दोन दिवस पुन्हा वादळी वा-यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूरसह विदर्भात दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.. नागपूर प्रदेशिक हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय.. मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटलाय. मात्र कडक उन्हाऐवजी विदर्भात सातत्यानं अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं सत्र सुरु आहे.