अकोला : आपली मुलं कधी राजकारणात येणार नाहीत आणि तिकीटही मागणार नाही, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केलीय. ते अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथे बोलत होते. 


सिंचन प्रकल्पांच्या कार्यान्वीत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्याच्या दौर्यावर होतेय.  बळीराजा जलसंजीवनी योजनेतंर्गत अकोला जिल्ह्यातील ११ रखडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कार्यान्वयन समारंभ यावेळी पार पडला. 


१८२० कोटींचा निधी मंजूर 


अकोला जिल्हयातील ११ प्रकल्पांसाठी १८२० कोटींचा निधी केंद्र सरकारनं मंजूर केलाय. यावेळी बोलतांना गडकरींनी आपण लक्ष्मीदर्शन न करता काम करतोय. म्हणूनच एकही कंत्राटदार माझ्याकडे येत नाहीत. संबंधिताला काम चांगलं नाही तर बुलडोझरखाली देण्याचा दमही देत असल्याचे गडकरी म्हणाले. 


आघाडी सरकार दोषी 


राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावरही गडकरींनी स्तुतीसुमनं उधळली. दरम्यान, सध्याच्या शेतकरी आत्महत्यांना मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारला दोषी धरलंय. आधीच्या सरकारच्या काळात सिंचनाच्या पैशांतून फक्त नेत्यांच्या तिजोऱ्यांचं सिंचन झाल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलीय.