पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सायंकाळी श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पोहोचले, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यानंतर दगडूशेठ गणपतीच्या रोषणाईचे देखील उदघाटन देखील करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत पुण्याच्या महापौर मुक्ता टिळकही उपस्थित होत्या.


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गणपतीला ४० किलो सोन्याचे नवे अलंकार घडवण्यात आले आहेच. यात मुकुटापासून सोवळ्यापर्यंतच्या दागिन्यांचा समावेश आहे. या दागिन्यांची किंमत जवळपास १५ कोटी रुपयांपर्यंत असल्याचं सांगितलं जातं.