मुख्यमंत्री नाशिक दौ-यावर, पालिकेच्या कामकाजाचा घेणार आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौ-यावर येणार असून ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मस्थळ असणा-या भगूर गावाला आणि सावरकरांच्या वाड्याला भेट देणार आहेत. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगूरमध्ये अभिवादन सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर एका शैक्षणिक संस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौ-यावर येणार असून ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मस्थळ असणा-या भगूर गावाला आणि सावरकरांच्या वाड्याला भेट देणार आहेत. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगूरमध्ये अभिवादन सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर एका शैक्षणिक संस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री नाशिक पालिकेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी पालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर विविध कामाचं सादरीकरण केलं जाणार असून शहर विकासासाठी तब्बल एकवीसशे कोटी रुपयांची मागणी केली जाणार आहे. शहरातील पाणी प्रश्न, रस्ते, जल शुद्धीकरण प्रकल्प, एस टी पी प्लांट यासह मुलभूत सेवा सुविधा पुरविण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याने नाशिक दत्तक घेणारे मुख्यमंत्री काय घोषणा करतात याकडे लक्ष लागलं आहे.