मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यात त्यांचा दौरा असणार आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा, शेतकरी, व्यापारी तसेच कामगारांशी संवाद, पत्रकार परिषदा असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आलाय. 


तीन जाहीर सभा होणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी ते सर्वप्रथम चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे शेतकऱयांशी संवाद साधतील. त्यानंतर दिवसभरात विविध कार्यक्रमांप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या तीन जाहीर सभा होणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीनं उध्दव ठाकरे यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातोय. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त स्थानिक पक्षसंघटनही यंत्रणाही सज्ज झालीय.


मुख्यमंत्र्यांचाही पश्चिम महाराष्ट्र दौरा


उद्धव ठाकरेंसोबत मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस यांचाही कोल्हापूर, सातारा आणि सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. आज आणि उद्या कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचा भरगच्च कार्यक्रम आहे.