सेलिब्रेशनइतकीच सुरक्षाही महत्त्वाची; महिलांसाठी 10 महत्त्वाच्या Tips

नव्या वर्षाच्या स्वगातासाठी सध्या सर्वजण सज्ज होत असून, यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून महिलांसाठी काही महत्त्वाच्या Tips. 

Dec 30, 2024, 14:28 PM IST

New Year 2025  सेलिब्रेशनदरम्यान कशी घ्याल काळजी? महिलांच्या सुरक्षिततेच्या हिशोबानं महत्त्वाच्या टीप्स. 

1/7

लक्ष

New Years 2025 year end Eve safety tips for women

तुमच्या आजुबाजूच्या परिसरावर लक्ष केंद्रीत करा, गर्दीच्या ठिकाणी असतानाही सतर्क राहा. एखाद्या ठिकाणी जायचं झाल्यास विश्वासू मित्रमैत्रिणींसमवेत जा. 

2/7

प्रवासाचा बेत

New Years 2025 year end Eve safety tips for women

तुम्ही सेलिब्रेशनसाठी ज्या ठिकाणी जात आहात तिथं जाण्यासाठी आणि तिथून येण्यासाठीचं साधन आणि प्रवासाचा बेत आखा. पर्यायी व्यवस्था तयार ठेवा. एखाद्या नव्या ठिकाणी असाल तर त्याविषयीची माहिती कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या Whats App ग्रुपमध्ये शेअर करा.   

3/7

परिस्थितीची कल्पना

New Years 2025 year end Eve safety tips for women

कुठंही गेलं असताना तिथं तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली तर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. आपल्या जवळच्या व्यक्तीला परिस्थितीची कल्पना द्या.   

4/7

सावधगिरी

New Years 2025 year end Eve safety tips for women

सेलिब्रेशनच्या निमित्तानं मद्यपान करणार असाल तर नशेत वाहन चालवणं टाळा. मद्यपानाचा अतिरेक टाळा. अंमली पदार्थ आणि तत्सम गोष्टींच्या आहारी जाऊ नका. 

5/7

फोन

New Years 2025 year end Eve safety tips for women

घराबाहेर पडताना तुमचा फोन चार्ज करून घ्या. शिवाय सोबत बॅटरी बॅकअप बाळगा. फोनसमवेत पेपर स्प्रे, नेलकटर अशा गोष्टी सावधगिरी म्हणून सोबत बाळगा. एखाद्या ठिकाणी गेलं असता कठीण प्रसंगात तिथं तुम्हाला बाहेर पडण्यासाठीची वाट ठाऊक असेल अशी व्यवस्था करा. 

6/7

New Years 2025 year end Eve safety tips for women

थोडक्यात सेलिब्रेशनसमवेत सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची हे विसरु नका. एखाद्या नव्या ठिकाणी जाताना आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीचीसुद्धा काळजी घ्या. 

7/7

New Years 2025 year end Eve safety tips for women

(सर्व छायाचित्र- फ्रीपिक)