पुणे : विधानसभा निवडणुक तोंडावर आली असताना राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला गळती सुरु असून भाजपा-सेनेत मोठ्या प्रमाणात नेत्यांची भरती सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. बारामतीत झालेल्या पावसावर शरद पवार यांच्याळी फोनवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परतीच्या पावसाने पुण्यात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत यामध्ये दहा जण दगावल्याचे वृत्त समोर येत आहे. मुसळधार पावसाने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरांमध्ये चिखल साचला आहे. जनावरे मृत पडली आहेत.


सतर्कतेचा इशारा म्हणून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता पाऊस ओसरला असून नागरिकांनी भयभीत होऊ नये असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे. 



पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याविषयी 'झी २४ तास'शी संवाद साधला. परतीचा पाऊस कधीही इतका मोठा नसतो. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पाऊस आहे. प्रशासन शक्य तेवढी मदत पोहोचवत असल्याचे ते म्हणाले.