मुंबई : महाराष्ट्रात आमच्या युतीने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. मागच्या वेळीस आम्ही 41 जागा जिंकल्या होत्या. यावेळेस त्याहीपेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देशात मोदींच्या नेतृत्वात एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले आहे. या देशात मोदीजींच्या बाजूने सायलेंट वेव आहे. देशातील जनता मोदींना निवडून देण्यास तयार असल्याचे दिसून आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुष्काळासारख्या समस्यातून आपल्याला युतीचे सरकार बाहेर काढू शकेल असा विश्वास जनतेला आहे. त्यामुळेच आमच्यावर विश्वास दाखवल्याचे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी इतर घटक पक्षांचेही आभार मानले. 



सुजय विखे विजयी


नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील यांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादीने डॉ. सुजय विखे यांच्यासाठी जागा न सोडल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली होती. तर भारतीय जनता पक्षाने डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली होती. नगरमध्ये या २ युवा नेत्यांमध्ये चांगलाच सामना रंगला होता. संग्राम जगताप दोन वेळा नगरचे महापौर होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे अनिल राठोड यांचा पराभव केला होता. वंचित बहुजन आघाडीकडून सुधाकर आव्हाड मैदानात होते. मात्र भाजमध्ये प्रवेश करणारे सुजय विखे पाटील यांचा अखेर अहमदनगर मतदारसंघातून विजय झाला आहे.